मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये लोकांना जेवण वाढताना दिसली सुहाना खान, शाहरुखच्या लेकीचं होतंय कौतुक!

The Archies Star Caste Serves Food: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर सुहानाचे व्हिडीओ आणि फोटो रोजच चर्चेत असतात. आता ती ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त ती द आर्चीजच्या स्टारकास्टसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवण वाढताना दिसली आहे.

देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी ‘द आर्चीज’ चित्रपटातील स्टार्सनी वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा आणि इतर स्टार्स मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण देताना दिसले. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

तिन्ही स्टार्सच्या या अंदाजाने लाखो चाहत्यांची मने जिंकली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुहाना खान पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, 15 ऑगस्टच्या निमित्ताने खुशी कपूरने लाइट पीच कलरचा सूट परिधान केला होता. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटले. त्यामुळेच चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत.