उर्फी जावेद मुलीला करतेय डेट? कथित गर्लफ्रेंडला किस करतानाचा फोटो व्हायरल

टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ओटीटी सीझन 1’ ची स्पर्धक उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या असामान्य कपड्यांमुळे चर्चेत राहिली असली तरी यावेळी ती ज्या गोष्टीमुळे चर्चेत आहे ती खूपच धक्कादायक आहे. उर्फीने सोशल मीडियावर एका मुलीला ओठांवर किस करतानाचा फोटो शेअर केला आहे, जो इंटरनेटवर आगीसारखा पसरला आहे. हे पाहिल्यानंतर युजर्स विचारत आहेत की उर्फी बायसेक्शुअल आहे का? उर्फी जिला किस करत आहे त्या मुलीबद्दल जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता आहे.

उर्फी जावेदने ट्विटरवर एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोत दोघीही ओठांचे चुंबन घेत आहेत. हा फोटो शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लव्ह या.’ हा फोटो पाहिल्यानंतर यूजर्स अनेक प्रश्न विचारत आहेत. फोटोतील मुलगी उर्फीची प्रेयसी असल्याची चर्चा रंगली आहे.

उर्फी जावेदची रुमरर्ड गर्लफ्रेंड (Urfi Javed Rumored Girlfriend) दुसरी कोणी नसून तिची जवळची मैत्रीण आहे, तिचे नाव काजोल त्यागी (Kajol Tyagi) आहे. काजोल एक कलाकार, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे.