मराठा आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Chandrashekhar Bawankule: महायुती सरकारचा मोठा विजय!! राज्यातील महायुती सरकारने भक्कमपणे सुप्रीम कोर्टात बाजू मांडल्यामुळे कायदेशीर मराठा आरक्षण मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगित झालेलं मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त झाला.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कुठल्याही प्रवर्गाला धक्का न लावता मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी महायुती सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मजबुतीनं मांडेल आणि मराठा समाजाला न्याय देईल ही खात्री आहे.
जय जिजाऊ- जय शिवराय, अशा आशयाचे ट्वीट करत बावनकुळे यांनी मराठी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली