Narendra Modi आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर; हजारो कोटींच्या विकासकामांचे होणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) दौऱ्यावर जाणार असून जम्मूमध्ये तीन हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण ते करणार आहेत. या वेळी नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं जाईल. त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करतील.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एमए मैदानाच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सभेसाठी एक लाखांहून अधिक लोक येण्याचा अंदाज आहे. ही पंतप्रधान मोदींची (Narendra Modi) काश्मीरमधली दुसरी सभा असेल. रामबाण जिल्ह्यातल्या संगलदान पासून बारामुल्लापर्यंत धावणाऱ्या रेल्वेला पंतप्रधान दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवतील. दुसऱ्या टप्प्यात मे जून महिन्यात कटरापासून रीसीपर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारणार आहे. त्यानंतर काही काळातच काश्मीर संपूर्ण देशाशी रेल्वेने जोडलं जाणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ पद्धतीने प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानाचंही लोकार्पण करणार आहेत; मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. देशातल्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या बळकटीकरणासाठी विविध शैक्षणिक संस्थांना या योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला शंभर कोटी रुपये तर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला 20 कोटी रुपयांचं अनुदान जाहीर झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं