Sunetra Pawar | “पुरंदर तालुक्यातील गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटीबद्ध”, सुनेत्राताईंची ग्वाही

Sunetra Pawar: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) कालपासून पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.  गुंजवणीच्या पाण्यासोबत पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरात आय. टी. पार्क उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात किंचितशीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही राख येथे बोलताना सुनेत्रा पवार यांनी दिली.

पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुरंदर सारख्या पुण्यालगत वसलेल्या तालुक्यातील अनेक गावात समस्या आजही कायम आहेत. त्या सोडवण्यासाठी मी कटिबध्द  आहे. यावेळी ग्रामस्थांनी आता तुमच्याकडून खूप आशा आहेत, असे सांगून त्यांचे प्रश्न मी मार्गी लावेन याबाबत विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द असून तो मी पाळणारच असेही पवार यांनी सांगितले.

गुंजवणीच्या पाण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो शब्द दिला आहे तो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या प्रश्ना सोबत इतर प्रश्र्नी केंद्र शासनाकडे ताकदीने प्रयत्न करेन, अशी ग्वाही कोळविहिरे इथे बोलताना सुनेत्रा पवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका