लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी… पक्ष गेले, चिन्ह गेले… आणि आता स्वाभिमानही गेला – म्हात्रे 

Sharad Pawar Uddhav Thackeray meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पवार यांचे निवास स्थान ‘सिल्वर ओक’मध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यादेखील उपस्थित होत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली.

दरम्यान, या भेटीवर आता शिवसेनेने टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी यावर भाष्य केले असून ठाकरेंवर निशाणा साधला आहे.लाचारांची स्वारी सिल्व्हर ओक च्या दारी…आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला… कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी‌ गेला…  पक्ष गेले, चिन्ह गेले…आणि आता स्वाभिमानही गेला… अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.