Sunil Tatkare | महायुतीत बरोबरीने आपण काम करुन विकासाचा प्रवाह या मतदारसंघात वाहत ठेवुया

Sunil Tatkare | तुमची – आमची भाषा सर्वसामान्य लोकांची आहे त्यामुळे या मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी उभी राहिल आणि महायुतीत बरोबरीने आपण काम करुन विकासाचा प्रवाह या मतदारसंघात वाहत ठेवुया असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी महाड बिरवाडी येथे महायुतीच्या जाहीर सभेत व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य लोकांची कामे करणे हे आपले उत्तरदायित्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही दिली. खेड्यापाड्यातील लोकांना मतांचा अधिकार दिला. अदानी- अंबानी यांच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत माझ्या खेड्यापाड्यातील लोकांच्या मतांना आहे ही ताकद संविधानाने दिल्याच सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

अनंत गीते यांना मोदी सरकारमध्ये मंत्री पद मिळाले. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी काम केले. भारत सरकारने ज्या योजना केल्या त्या योजनांचे काम त्यांच्याकडे होते परंतु मतदारसंघातील एकाही महिलेला रोजगार दिला नाही असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी यावेळी केला.

अदिती तटकरे हिच्या महिला बालविकास मंत्रालयाकडून लेक माझी लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर घटू शकतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने हा घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होणार यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे राज्यसरकारच्या योजना आमदार भरतशेठ गोगावले हे मतदारसंघात देतीलच परंतु भारत सरकारच्या जितक्या योजना असतील त्या मोठ्या प्रमाणात मतदारसंघात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असाही शब्दही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

सुनिल तटकरे म्हणून मी, अदिती आणि अनिकेत तटकरे आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू आणि तुम्हाला राज्यातील निवडणूकीत टॉपटेन आमदारांमध्ये आणण्याची आमची जबाबदारी आहे असा शब्द सुनिल तटकरे यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांना दिला.

१८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दिनांक ७ मे रोजी मतदान करताना घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करा असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.

माझा श्वास कधी रोखला जाईल तर फक्त आणि फक्त घड्याळयाचा गजर दिनांक ४ जूनला निकालाच्या दिवशी झालेला दिसेल अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

महाराष्ट्रातील एक प्रमुख नेत्याची सभा आहे की काय असे बघताना आज वाटले इतकी प्रचंड गर्दी सभेला दिसली त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले.

ही आपली परीक्षा आहे. आपल्या सगळ्या नेत्यांनी आपल्यावर विश्वासाने जबाबदारी दिली आहे. त्यामुळे तटकरेंना कुठल्याही परिस्थितीत खासदार बनवायचे याचा आज संकल्प करायचा आहे. बिरवाडीत दोन जागृत देवस्थाने आहेत त्यामुळे इथे दिलेला शब्द हा अंतिम आहे असेही भरतशेठ गोगावले म्हणाले.

या निवडणुकीत ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून सुनिल तटकरे यांना कमीत कमी दोन लाखाचे मताधिक्य देण्याची जबाबदारी आपली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे विजयाची सुरुवात इथून करायची आहे असा शब्द भरतशेठ गोगावले यांनी दिला. यावेळी काल्पनिक स्वरूपाची विजयाची मतपेटी मतदारांकडून सुनिल तटकरे यांना देण्यात आली.

महाड विधानसभा मतदारसंघातील बिरवाडी येथे महायुतीची जाहीर सभा हजारो शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उत्साहात आज पार पडली.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा नेते विकास गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष निकम, निलिमा घोसाळकर, नितीन पावले आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते