पुणे महापालिकेने 18 हजार अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर, फ्लेक्स हटवले       

पुणे : नागरी प्रशासनाने शहरभर सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या 10 दिवसांत 18,000 हून अधिक अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर, फ्लेक्स, झेंडे हटवले आहेत.  पुणे महानगरपालिका (PMC ) प्रशासनाने ही मोहीम अशाच तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे सांगितले. त्यासाठी वॉर्ड कार्यालयांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.असं टाईम्स ऑफ इंडियाला (TOI) सांगितले.

पीएमसीच्या आकाश चिन्ह विभागाचे प्रमुख विजय लांडगे (vijay landge) म्हणाले, आम्ही पथकांना बेकायदेशीर बॅनर, फ्लेक्स, जाहिरात फलक यांच्यावर कारवाई सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही अतिक्रमण विरोधी विभागासोबत संयुक्त मोहीम राबवत आहोत. स्थानिक पोलीस आम्हाला पुरेसे संरक्षण देत आहेत. पीएमसीच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप (madhav jagtap) म्हणाले, “आम्ही धानोरी परिसरात मोहीम राबवली. बेकायदेशीर शेड व किऑस्क पाडण्यात आले. ही मोहीम शहरात सुरूच राहणार आहे.

गेल्या आठवड्यात अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान धानोरी (Dhanori) परिसरात एका नागरी कर्मचाऱ्यावर जमावाने हल्ला केला होता. महापालिका आयुक्तांनी पीएमसी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अनधिकृत बॅनर्सवरील कारवाईला वेग आला. आतापर्यंत पाच एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये 50 हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

पीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडील मोहिमेदरम्यान 3,748 हून अधिक फलक, 4,648 पोस्टर्स, 1,577 फ्लेक्स आणि 1,503 किऑस्क काढण्यात आले आहेत. याशिवाय, 3,520 बॅनर आणि 1,500 हून अधिक चिन्हे खाली पाडण्यात आली आहेत. चार जाहिरात होर्डिंग्जही काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग्ज उभारणाऱ्यांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावला जातो. बेकायदा होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी एकूण 29 मालमत्ताधारकांना 14.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.