Braking : शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे यातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे.

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.