परिसरात मुस्लिम युवकाचे निधन झाले कळताच खा. संजय जाधव मित्र मंडळाने केला गणेशोत्सवाचा देखावा बंद

परभणी – सध्या संपुर्ण राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होत आहे. कोरोनामुळे (Corona) तब्बल दोन वर्ष कोणतेही सामाजिक कार्य झाले नव्हते मात्र यंदाच्या वर्षी अती उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे. गणपती विसर्जनालाही 2 दिवस उरले आहेत त्यामुळे गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येनी बाहेर पडत आहेत.

असाच देखावा गांधी पार्क परिसरातील खा संजय बंडू जाधव (MP Sanjay Bandu Jadhav) मिञ मंडळानेही केला आहे. देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तही मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र परिसरातील एका मुस्लिम तरुणाचे अकाली निधन (Death of a Muslim youth) झाले कळताच मिञ मंडळाचे अध्यक्ष अजय शहाणे (Ajay Shahane) यांनी अर्ध्यातच देखावा बंद करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.