Supriya Srinet | कंगनावर पातळी सोडून टीका करणाऱ्या सुप्रिया श्रीनेत यांच्या अडचणी वाढल्या; महिला आयोग आक्रमक 

Supriya Srinet | भाजपा उमेदवार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत  यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगानं निवडणूक आयुक्तांकडं तक्रार नोंदवली आहे. असभ्य आणि अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या सुप्रिया श्रीनेत आणि एचएस अहिर यांच्या वर्तनाची दखल घेऊन त्यांच्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा (Rekha Sharma) यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.

दरम्यान, सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinet) यांच्या आक्षेपार्ह मजकूरावर भाजपकडून तीव्र टीका करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कठोर कारवाई करावी,असं भाजपच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, शेहजाद पूनावाला यांनीही ही घटना निंदनीय असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेसच्या समाज माध्यम आणि डिजिटल मंचांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुप्रिया श्रीनेत यांनी कथित आक्षेपार्ह मजकूराबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. आपण अशाप्रकारचा आक्षेपार्ह मजकूर कधीही प्रसारित करणार नाही, आपल्या समाजमाध्यमावरील खात्यावरून अन्य कोणीतरी हा मजकूर जारी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय