Chitra Wagh | ‘महिलाद्वेषाचं विष काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या अशा लहान-मोठ्या नेत्यांमध्ये पुरेपूर भरलेलं आहे’ 

Chitra Wagh | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिची हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी केली आहे. कंगनाच्या नावाच्या घोषणेवर अनेकांची मते समोर येत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाबद्दल अभद्र टिपण्णी केली आहे, ज्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

आता भारतीय जनता पक्ष कंगनाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर हल्लाबोल करत आहे. वाढता वाद पाहून सुप्रिया यांनी ती पोस्ट डिलीट केली, मात्र भाजप नेते स्क्रिनशॉटच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला करत आहेत. सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाला मंडीतून तिकीट मिळाल्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. कंगनाचा बिकीनीतील फोटो टाकत सुप्रिया यांनी लिहिले, बाजारात आज काय भाव सुरु आहे हे कोणी सांगू शकेल का?  सुप्रियाने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती.

दरम्यान, या टिकेनंतर नवा वाद निर्माण झाला असून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh
) यांनी यावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या,  निवडणुकीच्या धुळवडीत काँग्रेसवाल्यांचे महिलाद्वेषाने माखलेले हिडीस चेहरे एक-एक करून समोर येताहेत…राहुल गांधींच्या नारीशक्तीला संपविण्याच्या वक्तव्यांवरून यांना आपला हिंदू धर्म आणि महिलांना आदिशक्ती मानून केले जाणारे त्यांचे पूजन याचा किती तिटकारा आहे, हे समोर आलं होतं…

या चिखलफेकीत आता त्यांच्या पक्षाच्या महिला पदाधिकारीही उतरल्यात. कांग्रेसच्या महिला पदाधिकारी सुप्रिया श्रीनेत @SupriyaShrinate यांनी भाजपच्या मंडी लोकसभेच्या उमेदवार व अभिनेत्री कंगना राणावत यांच्या उमेदवारीवरून आक्षेपार्ह टिप्पणी केली…

कंगनाच्या फोटोसह ‘मंडी में क्या भाव चल रहा हैं’ अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली नंतर ती डिलीट केली असली तरी यावरून हा पक्ष स्त्रीचा किती सन्मान करतो, याची लक्तरे वेशीवर मांडणारीच ती पोस्ट होती..

अभिनयासारख्या कलेला, महिलेला बाजारू आणि विक्रीयोग्य ठरवण्याचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसनेच देशातल्या महिलांच्या आत्मसन्मानावर आजपर्यंत सपासप वार केलेत..महिलाद्वेषाचं विष काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या अशा लहान-मोठ्या नेत्यांमध्ये पुरेपूर भरलेलं आहे..ते विष या देशातल्या महिलाच आता उतरवतील…अशी जहरी टीका त्यांनी केलीय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय