Loksabha election 2024 | वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय  

भाजपने लोकसभेच्या 111 जागांसाठी (Loksabha election 2024) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे संबलपूरमधून आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत.

केंद्रीय मंत्री नित्यानंद राय उजियारपूरमधून, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह बेगुसरायमधून आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद बिहारमधील पटना साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अभिनेता अरुण गोविल हे मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी सुलतानपूरमधून तर उत्तर प्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून (Loksabha election 2024) भाजपचे उमेदवार असतील. यावेळी भाजपने पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांचे तिकीटही रद्द केले आहे.

काल भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे माजी नेते नवीन जिंदाल कुरुक्षेत्र मतदारसंघातून लढणार आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील तामलुक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे बेळगावमधून निवडणूक लढवणार आहेत. सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 14 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. पक्षाने अप्पर बुर्टुकमधून दिल्ली राम थापा आणि मानेबुंग-डेंटम विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र कुमार सुब्बा यांची नावे जाहीर केली आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार