Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

Pune News | लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. महायुतीतील नेत्यांनीच एकामेकांना विरोधात दंड थोपटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे पवार कुटुंबीयांना आव्हान देत माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.तर दुसरीकडे इंदापूर मधून विधानसभेचा शब्द घेतल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही असा पवित्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळे बारामती (Pune News) मधील हा वाद मिटवण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावरती खलबतं रंगल्याची पाहायला मिळाली. फडणवीस यांनी वादावती पडदा टाकण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. त्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची देखील माहिती समोर आली आहे.

या बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात इंदापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित कार्यकर्त्यांची संवाद साधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

तसंच हर्षवर्धन पाटील यांच्यावर बारामती सह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यामुळे पुढील कालावधीमध्ये हर्षवर्धन पाटील बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा प्रचार करताना दिसतील. एकूणच ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना समज देखील दिल्याचं बोललं जात आहे. विधानसभे बाबतचा शब्द देण्याबाबत आडलेल्या हर्षवर्धन पाटलांना “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा,” असे आदेश दिले आहेत.

बारामती मतदारसंघांमधून महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचं काम करा . विरोधात कोणताही प्रचार करू नका आणि समर्थक नाही तशी समज द्या असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी पाटलांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबाबत योग्य ती कारवाई करू असे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार