…यामुळे कळतंय आता सरकारवर विश्वास नाही – सुप्रिया सुळे

मुंबई : पाच राज्यात सध्या निवडणुकांचेबिगूल वाजल्याने सर्वांच्या नजरा या पाच राज्यावर लागल्या आहेत, अशावेळी उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींवरून विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशातील राजकारण देशात चर्चेत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचं राजकारण मंगळवारपासून जबरदस्त रंगात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्या स्वामी प्रसाद मौर्यांसोबत आणखी तिघांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकारण तापलं आहे.

भाजपमधील या राजीनामा सत्रावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘उत्तर प्रदेशमध्ये आता अनेक मंत्री राजीनामा देत आहेत. यावरून स्पष्ट होतं आहे की, लोकांना तेथील सरकारबाबत अविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे तिथं अशी हालचाल दिसू लागली आहे.’ अशी टीका सुप्रिया सुळेयांनी केली आहे