भाजपा नेते मोहित कंबोज यांनी १० हजार भोंग्यांची ऑर्डर दिली

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गुढीपाडव्याची सभेची चर्चा आणि पडसाद अद्याप उमटत आहेत. मशिदीवरचे भोंगे हटवावेत अथवा त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात मंदिरांवर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावावी, अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी १० हजार भोंग्यांची ऑर्डर दिली आहे.मोहित कंबोज यांनी १० हजार भोंग्यांची ऑर्डर दिली असून त्यापैकी ५०० भोंगे कंबोज यांच्या मुंबईमधील खार इथल्या निवासस्थानी आले आहेत.

याबद्दल बोलताना मोहित कंबोज म्हणाले की, आम्ही राज्यातल्या प्रत्येक मंदिरांत, ज्यांना ज्यांना गरज आहे, त्यांना मोफत भोंगे देण्याचा संकल्प केला आहे. हे भोंगे आता राज्यभरामध्ये मोफत वितरीत करण्यात येणार आहेत.

यावरुन संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण सुरु असताना या वादात आता करणी सेनेने (karani sena)  उडी घेतली आहे. करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अम्मू (surajpal ammu) यांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना  भोंग्यावरुन हायकोर्टाने दिलेला आदेश ज्या मशिदी पाळत नसतील त्या मशिदींचे माईक तोडा असे आदेश सूरजपाल अम्मू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. इतकच नव्हे जर हे काम करत असताना कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई झाली तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असंही आश्वासन सूरजपाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे.