आदित्य ठाकरेंसोबत देशभरातील शिवसैनिक आयोध्या दौऱ्यावर जाणार

मुंबई: खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (State Environment Minister and Shiv Sena leader Aditya Thackeray) 10 जूनला आयोध्या दौरा करतील. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही नेते सोबतच देशभरातून शिवसैनिक (Shivsainik)  दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा राजकीय नाही, श्रीरामावरील श्रद्धा आणि भक्ती मुळे आम्ही हा दौरा (Tour) करत आहोत. असं त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशच्या जनतेने (By the people of Uttar Pradesh) आम्हाला या दौऱ्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे दौऱ्याची पूर्ण तयारी केली जात आहे.कुणी खोट्या भावनेनं, राजकीय भावनेनं किंवा कुणाला कमी लेखण्यासाठी जात असेल, तर प्रभू रामांचा आशीर्वाद नाही मिळत. उद्धव ठाकरेंसह (CM Uddhav Thackeray) आम्ही सर्वजण आंदोलनात होतो. उद्धव ठाकरेंही अयोध्येत (Ayodhya) गेले होते. आदित्य ठाकरेही जात आहेत,’ असं राऊत यांनी सांगितलं.’

आदित्य ठाकरे अयोध्येला १० जून रोजी जाणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातूनच नाही, तर संपूर्ण देशातून शिवसैनिक, युवा सैनिक… शिवसेनेशी जोडले गेलेले उत्तर प्रदेशातील लोक अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येत जाऊन १० जून रोजी दर्शन घेणार आहेत अशी माहिती सुद्धा राऊत यांनी दिली.