सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय – सुळे

पुणे – हे सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय असे म्हणत त्यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. राजकारणाची पातळी खालावली आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी आमदारांचे बंड होते हे आता वेगळे सांगायची गरज राहिलेली नाही. असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शिंदे सरकार वर हल्लाबोल केला आहे.

(Rebel MLA) बंडखोरीच्या दरम्यान या सरकारचे कारनामे ही जनता विसरणार नाही. आता जरी हे जनतेचे सेवक असल्याचे सांगत असले तरी त्यांचा स्वार्थ हा काही लपून राहिलेला नाही. पण तेच आता विठ्ठलाचा आशिर्वाद (Blessings of Vitthal) घेण्यासाठी आल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (MP Supriya Sule) यांनाच टार्गेट केले आहे.

विठ्ठलाचे आशीर्वाद आणि आभार मानण्यासाठी मी आले आहे. सरकार अस्थिर आहे, दादा म्हणतोय ते खरं आहे. लोक सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारतदर्शन (BharatDarshan) करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रियाही दिली आहे.

शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार आहोत. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावल्या सारखे आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या 25 वर्षासाठी शुभेच्छा, असा टोमणाही मारला.