संतांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या सुषमा अंधारे म्हणतात, “उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचंय ”

सोलापूर : वारकरी संप्रदायातील संताच्या वरोधात गरळ ओकणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची काल सोलापुरात जाहीर सभा पार पडली. यावेळी अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा राज्याच्या प्रमुखपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार व्यक्त केलाय.  अंधारे यांनी  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा व्हीडिओ दाखवला आणि उपस्थित शिवसैनिकांना आवाहन केलं.

“हा व्हीडिओ मी यासाठी दाखवला की उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाचं चित्र सर्व शिवसैनिकांच्या मनात साठलं पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर, विधानभवनावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे”, असा निर्धार सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणतात हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. यांचे सामान्य लोक म्हणजे कोण? तर सुभाष देशमुख, निलंगेकर, वगैरे वगैरे… देवेंद्रजींनी एका महिन्यात 15 लोकांना क्लिनचीट देवून क्लोजर रिपोर्ट कसा काय दिला? यावर आम्ही सरकारला प्रश्न विचारणारच, असं अंधारे म्हणाल्यात.