PMPML कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार, वेतनात वाढ होणार – नाना भानगिरे

पुणे : PMPML चे कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर महिन्याच्या वेतनात आयोगाच्या फरकानुसार वाढणाऱ्या वेतनाची 50 टक्के रक्कम जमा केली जाणार आहे. पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे (Nana Bhangire) यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

आज PMPML मध्ये या मागणीबाबत बैठक घेण्यात आली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी ही बैठक घेतली,डिसेंबर महिन्याच्या वेतनापासूनच सातव्या वेतन आयोगाच्या फरकानुसारची 50 टक्के वेतनवाढ दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, सुमारे 11 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे, त्याबाबत उद्या ( मंगळवारी) अधिकृत आदेश काढला जाणार आहे

तर जानेवारी 2023 मध्ये आयोगा बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक घेऊन सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर उर्वरीत 50 टक्केवाढीनुसार, वेतन देण्यास सुरूवात केली जाणार आहे.

नाना बनगिरे यांनी ओमप्रकाश बकोरिया यांना निवेदन केले की कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी जागा निश्‍चित करणे , वैद्यकीय बिलांसाठी तातडीनं निधी उपलब्ध करून तसेच डेपोच्या परिसरात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे , कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन सुरू करण्यात यावे, PMPML चे अध्यक्ष यांनी सर्व मागण्या लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे आश्वासन दिले. नाना भानगिरे यांच्यासह कामगार प्रतिनिधी नरेंद्र आवारे, श्रवण तौर, उमेश पांढरे यावेळी उपस्थित होते.