Ajit Pawar | सुनेत्रा पवार आणि सुनिल तटकरेंनी दाखल केले उमेदवारी अर्ज, अजित पवारांनीही भरला डमी अर्ज

Ajit Pawar | महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीतील रायगड आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्राताई पवार यांनी तर रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांनी आज अर्ज दाखल केले.

बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीयमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल उपस्थित होते. तर रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार सुनिल तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आदींसह महायुतीचे आमदार उपस्थित होते

अजित पवारांनीही दाखल केला डमी अर्ज
राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीमधून डमी अर्ज दाखल केला असल्याचे सांगतानाच रायगडमधून पुन्हा एकदा सुनिल तटकरे यांना पक्षाने उमेदवारी दिली असल्याचे स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले