Tamilnad Mercantile Bank IPO: देशातील सर्वात जुन्या बँकेचा IPO आजपासून खुला

मुंबई, ३० ऑगस्ट २०२२ : तमिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेडचा आयपीओ (Tamilnad Mercantile Bank IPO) ५ सप्टेंबर २०२२ रोजी खुला होणार आहे. यामध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले एकूण १,५८,४०,००० इक्विटी शेअर्स असून त्यामध्ये १,५८,४०,००० पर्यंत नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

ऑफरचा प्राईस बँड प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ५०० ते ५२५ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी २८ इक्विटी शेयर्ससाठी आणि त्यापुढे २८ च्या गुणांकांमध्ये बोली लावावी लागेल.

नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीतून जे भांडवल उभे राहील त्याचा वापर बँकेच्या प्रथम स्तरातील भांडवल आधारामध्ये वाढ करण्यासाठी करण्याचा बँकेचा प्रस्ताव आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या भांडवल पर्याप्ततेसंदर्भातील नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तसेच बँकेच्या संपत्ती, प्रामुख्याने बँकेच्या लोन/ऍडव्हान्सेस आणि गुंतवणूक पोर्टफोलिओमधील वाढीमुळे निर्माण होण्याची अपेक्षा भविष्यातील भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या भांडवलाचा उपयोग केला जाणार आहे.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार,  संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत आणि सेबी आयसीडीआर नियमांच्या कलम ६(२) ला अनुसरून देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ७५% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.

क्यूआयबी पोर्शनपैकी ५% (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी शेअर्स हे क्यूआयबीना वाटपासाठी उरलेल्या नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील.

या नेट ऑफरमधील कमीत कमी १५% भाग क्वालिफाईड नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सना प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील त्यापैकी एक तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी आणि यापैकी दोन तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, पण त्यासाठी अशा उप-विभागांपैकी एकातील सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्सच्या इतर उप-विभागातील अर्जदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार वाटून दिला जाईल. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे.

नेट ऑफरपैकी कमीत कमी १०% भाग हा सेबी आयसीडीआर नियमांनुसार रिटेल व्यक्तिगत बिडर्सना (“रिटेल पोर्शन”) सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील. यासाठी ऑफर किमतीपेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या  खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

रिटेल व एनआयआय बोली लावणाऱ्यांसाठी (५,००,००० रुपयांपर्यंतच्या बोली) युपीआय मॅन्डेट स्वीकारण्याची वेळ आयपीओ  बंद होण्याच्या दिवशी ७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच असेल.

तपशीलवार माहितीसाठी रेड हेररिंग प्रॉस्पेक्टसच्या पान क्रमांक ३२६ वर सुरु होणारे द ऑफर प्रोसिजर पाहावे. या रेड हेररिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग हे बीएसई व एनएसईमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अड्वायजर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आहेत.