भारतीय फलंदाज तन्मयने तोडला विश्वविक्रम, केले सर्वात वेगवान त्रिशतक; एका डावात 26 षटकारही ठोकले

Tanmay Agarwal 26 Sixes 366 Runs Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफी 2024 च्या सामन्यात हैदराबाद संघाने अरुणाचल प्रदेश विरुद्ध चमकदार कामगिरी केली. संघाने 60 षटकांत (59.3 षटकांत) 615 धावा केल्या. या खेळीत तन्मय अग्रवाल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ज्याने 366 धावांच्या शानदार खेळीत 26 षटकार ठोकले. या खेळीत त्याच्या बॅटमधून 34 चौकारही आले. विशेष म्हणजे तन्मयने अवघ्या 181 चेंडूत 366 धावा केल्या.

जागतिक विक्रम मोडला
तन्मयने या खेळीत 26 षटकार मारून विश्वविक्रमही केला. जगभरातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणीच्या डावात सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोच्या नावावर होता, ज्याने प्रथम श्रेणी सामन्यात 281 धावांच्या खेळीत 23 षटकार ठोकले होते. 2014-15 मध्ये त्याने हे केले होते. म्हणजेच भारताच्या तन्मयने तब्बल 10 वर्षांनंतर आता हा विश्वविक्रम मोडला आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार
तन्मय अग्रवाल- 26 षटकार (366 धावा), रणजी ट्रॉफी 2024
कॉलिन मुनरो- 23 षटकार (281 धावा), प्लंकेट शील लीग 2014-15
शफीकुल्ला शिनवारी- 22 षटकार (200 धावा), 4 दिवसीय स्पर्धा (अफगाणिस्तान) 2017-18
प्रमोद भानुका राजपक्षे- 19 षटकार (268 धावा), 2018-19
नजीब तारकई- 19 षटकार (200 धावा), 4 दिवसीय स्पर्धा (अफगाणिस्तान) 2018-19
ओशादा फर्नांडो- 17 षटकार (234 धावा), 2018-19

सर्वात वेगवान दुहेरी-तिहेरी शतक
तन्मय अग्रवालने 366 धावांच्या स्फोटक खेळीत एक नाही तर अनेक विश्वविक्रम केले. त्याने पहिल्या 119 चेंडूत रणजी इतिहासातील सर्वात जलद द्विशतक झळकावले. यानंतर जगभरातील प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च त्रिशतकही त्याच्या बॅटने 147 चेंडूत झळकावले. त्याने केवळ रणजीच नव्हे तर जगभरातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या अनेक दिग्गजांना मागे सोडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस जवानांना शौर्य पदके

कारागृह विभागातील ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर

अजित पवार यांनी आपल्या मुलाला समजावलं पाहिजे; खडसेंनी थेट अजितदादांना फटकारले