नेहरूंचा प्रस्ताव टाटांनी मान्य केला आणि सौंदर्य प्रसाधने बनविणारा एक हक्काचा देशी ब्रॅंड मिळाला

नवी दिल्ली – 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताच्या प्रगतीच्या एका नवीन पर्वाची सुरुवात झाली होती. पंतप्रधान नेहरू यांचा एक मानस होता की प्रत्येक गोष्ट भारतातचं बनावी. स्वदेशी वर त्यांचा अधिक भर होता. त्यावेळेस टाटा समहू देखील मिठापासून ते  विमानपर्यत सर्व काही बनवत होते.

एकदा पंडित नेहरू आणि जे आर डी टाटा एका मीटिंगमध्ये बसले होते. तेव्हा नेहरू  यांनी जे. आर. डी यांच्या समोर एक मुद्दा मांडला. तो  मुद्दा असा होता की भारतीय महिला सौंदर्य प्रसाधने म्हणजेच  कॉस्मेटिक्स या गोष्टीवर सर्वाधिक पैसे खर्च करतात. आणि ही सर्व उत्पादने आपण परदेशातून  मागवितो त्यामुळे त्यावरील सर्व नफा हा  परदेशी कंपन्यांना मिळतो. जर आपण भारतातच चांगल्या दर्जाची ही उत्पादने बनविली तर फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आपल्या देशातील पैसा आपल्या देशातच राहील. तुम्ही अगदी मीठा पासून ते विमानापर्यत सर्व काही बनविता, तुम्ही कॉस्मेटिक्स देखील बनवायला हवे.

नेहरूनी त्याचा विचार जे आर  डी यांच्या समोर मांडला. जे. आर. डी यांना देखील ही कल्पना पटली. त्यांनी लगेच त्यावर अभ्यास करायला सुरुवात केली. नवल टाटा यांची पत्नी सीमोन आणि  जे. आर. डी टाटा यांच्या विचारातून टाटा समूहाने एक  सौन्दर्य प्रधाणे  बनविणारी कंपनी सुरू करण्याचे ठरविले. पंतप्रधान नेहरू यांची इच्छा होती की त्या कंपनीचे नाव लक्ष्मी ठेवावे, कारण लक्ष्मी म्हणजे सुबकता ,समृद्धी त्यांनी जे. आर. डी यांना हे नाव सुचविले. परंतु सीमोन यांना मात्र हे नाव फारसे आवडले नाही. त्याच्या मते  सौन्दर्य प्रधानाला असे नाव हवे ज्यामुळे उच्च वर्गासह इतर सर्व महिला देखील  या ब्रॅंड कडे आकर्षित झाल्या पाहिजेत.

त्यांनी लक्ष्मी या नावावर थोडा आणखी अभ्यास केला आणि मग त्यांना फ्रेंच भाषेतील एक सुंदर नाव सापडले ते म्हणजे लॅक्मे. फ्रेंच भाषेत लक्ष्मीस  लॅक्मे म्हणतात. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनाच्या ब्रॅंडचे नाव ठरले  “लॅक्मे”  हे नाव  इंदिरा गांधी  यांना  देखील खूप आवडले. नेहरुनी देखील या नावाला मान्यता दिली अशा प्रकारे भारताला सौंदर्य प्रसाधने बनविणारा एक हक्काचा देशी ब्रॅंड मिळाला. लॅक्मे हा भारतातील कॉस्मेटिक्स विश्वातील सर्वात मोठा आणि जुना ब्रॅंड आहे. आज देखील लॅक्मे भारतात नंबर एक वर आहे.