इंग्रजांच्या नाकावर टिच्चून टाटांनी उभे केले ‘ताज’

मुंबई – मुंबईमध्ये हॉटेल ताज हे एक वेगळं समीकरण आहे. पर्यटक असो किंवा प्रवासी जो कोणी मुंबईत जातो ,तेव्हा तो व्यक्ती ताज हॉटेल बाहेरून तरी पाहतोच. ताज आज देखील भारतातील एक सुंदर हॉटेल आहे. असे जगप्रसिद्ध हॉटेल उभा करण्यामध्ये जे. आर. डी टाटा यांचा मोठा वाटा आहे. हे हॉटेल उभे करण्यामागे देखील खूप रंजक कथा आहे.

ती कथा अशी आहे की भारत तेव्हा स्वातंत्र्य झाला नव्हता. आपण पारतंत्रामध्ये होतो. तेव्हा भारतात सर्वात प्रथम सिनेमाा रिलीज होणार होता. हा सिनेमा मुंबईतील हॉटेल वाटसनमध्ये लागला होता. जे. आर. डी यांना देखील हा सिनेमा पाहायचा होता. जे. आर. डी तो सिनेमा पाहण्यासाठी तेथे गेले तेथे एक फलक लावला होता. तो फलक पाहून जे. आर. डी यांना प्रचंड दुख झालं. तो बोर्ड असा होता की या हॉटेलमध्ये कुत्रा आणि भारतीय यांना प्रवेश नाही. हे पाहून जे. आर. डी यांनी ठरविले ते जगातील सर्वात सुंदर असेल एक हॉटेल उभे करेल आणि अशा प्रकारे ताज या हॉटेलची उभारणी करण्यात आली.

जे. आर. टाटा यांनी टाटा समूहास अशा एका वेगळ्या उंचीवर पोहचविले आहे, ज्यामुळे टाटा समूहाचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहे. उद्योग क्षेत्रात आज देखील भारत म्हटलं की टाटा हा शब्द जोडला जातो. एअर इंडिया, टाटा मोटर्स, इंडियन एयरलाइन्स, टाटा सामाजिक विज्ञान संस्था यासारख्या असंख्य संस्था आणि उद्योग यांच्या उभरणीमध्ये जे. आर. डी यांचा मोठा वाटा आहे. टाटा समूहाचे असे अनेक उद्योग आहेत जे आपल्याला माहीत देखील नाहीत की हे उद्योग भारतीय आहेत आणि टाटा समूहाचे आहेत.