ह्या अनुभनासाठी खूप धन्यवाद.. शिवाजी पार्कमधील मनसेच्या दीपोत्सवातील तेजस्विनीची खास पोस्ट

Tejaswini Pandit: दिवाळीनिमित्त (Diwali 2023) दरवर्षी मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये आकर्षक रोषणाई केली जाते, दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाही मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park Dipotsav) सुंदर विद्युत रोषणाई केली गेली आहे. दिवाळीतील हे खास आकर्षण पाहण्यासाठी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अनेकांनी शिवाजी पार्कमध्ये गर्दी केली होती. यात मराठी सेलिब्रिटीचांही समावेश होता. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतदेखील शिवाजी पार्कमधील दीपोत्सवात सहभागी झाली होती.

तिने राज ठाकरेंचा (Raj Thackeray) एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरे बाल्कनीत उभे असल्याचं दिसतंय. समोर फटाक्यांची आतिषबाजी आणि खाली दिव्यांचा झगमगाट दिसतो आहे.

तेजस्विनीने राज ठाकरेंचा पाठमोरा फोटो स्टोरीमध्ये शेअर करत, ह्या अनुभनासाठी खूप खूप धन्यवाद साहेब असं लिहिलंय. दीपोत्सव २०२३, राज साहेब ठाकरे असे हॅशटॅग वापरत तिने ‘हे सगळं तुम्हीच करू जाणे…’ असंही लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत