सायनाला हरवणाऱ्या मालविकाच्या आईने तिचा डॉक्टरी पेशा आणि घर देखील सोडलं आहे..

नागपूरच्या 20 वर्षांच्या मालविकाने सायना नेहवालला हरवलं

नागपुरची आंतरराष्ट्रीय महिला बॅटमिंटनपटू मालविका बनसोडे हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन बॅटमिंटन स्पर्धेत लंडन ऑलिंपिकमधील ब्रॉझपदक विजेत्या सायना नेहवालवर अनपेक्षित विजय मिळवल्यानंतर सर्व स्तरातून मालविकाचे कौतुक होत आहे.

मालविका अवघ्या 20 वर्षांची आहे. मालविकाचा हा विजय खरंच अभिमानस्पद आहे. मालविकाचे गुरु किरण माकोडे म्हणतात आपल्या शिष्याच्या कामगिरीवर आनंद आहे.

सायना विरुद्ध ती खरंच खूप चांगलं खेळली. यामागे तीची आणि तीच्या आईची मेहनत आहे. तिच्या कुटुंबाने देखील तिच्यावर फार मेहनत घेतली. मालविकाची एक विशेष गोष्ट म्हणजेसांगितलेली प्रत्येक गोष्ट ती मन लावून करते. मालविकाच्या यशामध्ये तीच्या आईचा मोठा वाटा आहे. मालविकाची आई डॉ. तृप्ती बनसोडे यांनी मालविकासाठी आपलं घर आणि त्या नंतर त्यांचा डॉक्टरी पेशा देखील सोडला.

त्यांनी तिच्यासाठी स्पोर्ट सायन्स विषयात पदवी देखील घेतली.मालविकाने रायपूरमध्ये सराव केला.2016 पासून तृप्ती देखील तिच्यासाठी रायपूरमध्ये शिप्ट झाल्या. मालविका स्पोर्ट बरोबरच अभ्यासात देखील तितकीच हुशार आहे. तिने 10 वी आणि 12 वीत 90 टक्के गुण मिळविले आहेत.