वृद्धाश्रमाची संस्कृती संपुष्टात यावी – संचेती

कांतिलाल संचेती यांच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमात आंबे वाटप

पुणे : आई – वडील दिवसांची रात्र करून मुलांना लहाणाचे मोठे करतात. त्यांना उत्तम शिक्षण आणि संस्कार देऊन त्यांना स्वताच्या पायांवर उभे करतात.पण काही मुलं मात्र त्यांच्यावर जबाबदारी आली की आई – वडिलांची पाठवणी वृद्धाश्रमात करतात. वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे वृद्धाश्रम ही आपली नसलेली संस्कृती संपूष्टात यावी असे मत स्व . इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती यांनी व्यक्त केले. नाना पेठ येथील व्यापारी स्व. कांतीलाल संचेती यांच्या स्मरणार्थ मातोश्री वृद्धाश्रम येथे आंबेवाटप करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

कांतीलाल संचेती यांचे मागील महिन्यांत निधन झाले. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कुटुंबाने देहदान केले. त्यांच्या या स्मृतिप्रीत्ययार्थ संचेती परिवाराने सामजिक बांधिलकी ठेवत ९० हून अधिक वृद्धाना आंबा वाटप केले. या प्रसंगी स्व . इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती, ईश्वर संचेती, महेंद्र संचेती, जीवन संचेती, मयूर संचेती, महेश गायकवाड , विजय शिंगवी आदी उपस्थित होते. ईश्वर संचेती परिवाराने आज केलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे, कारण आपण आपल्या कुटुंबांसोबत अनेक आनंदाचे क्षण साजरे करत असतो, पण एखाद्या आनंदाचा क्षण दुसऱ्याच्या आयुष्यात निर्माण करणे महत्वाचे आहे, असे देखील मत अभय संचेती यांनी व्यक्त केले.