आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीबाबत महिला व बालविकास विभागाकडून नवा जीआर

मुंबई :महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल पत्रकार परिषद घेऊन, आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती स्थापन केल्याबाबत माहिती दिली होती.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाने या समितीच्या नावात बदल केला असून, विभागाने काढलेल्या नवीन जीआरनुसार समितीच्या नावातील आंतरजातीय हा शब्द वगळण्यात आलेला आहे. आता ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती (राज्यस्तरीय)’ असे या समितीचे नाव असणार आहे. तसेच केवळ याच प्रकारातील तक्रारींचे निवारण करण्याचे काम ही समिती करणार आहे.

आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली किंवा महिलांना काही तक्रार उद्भवल्यास त्यांच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे देखील या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. श्रद्धा वालकार प्रकरण घडल्यानंतर, यापुढील काळात असे प्रकार घडू नयेत आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली किंवा महिला व त्यांचे मूळ कुटुंबीय यांच्यात समन्वय साधण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.