अविनाश भोसलेंचा ताबा घेण्यास ईडीला परवानगी

मुंबई – डीएचएफएल मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भातील (DHFL money laundering case) चौकशीसाठी उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale)यांचा ताबा मिळावा यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने मागणी केली होती. गेल्या महिन्यात याच गुन्ह्यासाठी भोसले यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे.

आता ईडीने त्यांच्याविरोधात वॉरंटसाठी मागणी करुन त्यांची चौकशी करण्याची परववानगी मागितली. त्याचप्रमाणे कोर्टाने फरिद सामा (Farid Sama) नावाच्या व्यक्तिविरोधातही अजामिनपात्र वॉरंट प्रसिद्ध केले. सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. याच गुन्ह्यात सीबीआयनेही पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.