ढगफुटीच्या घटना आणि पूरांमागे विदेशी शक्तीचा हात; के चंद्रशेखर राव यांचा दावा

 नवी दिल्ली –  राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमागे परदेशी हात असून ढगफुटी हा एक कट असल्याचं तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K Chandrashekar Rao)यांनी म्हटलंय. भद्रचलम येथील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना चंद्रशेखर राव यांनी हे विधान केलं आहे.

देशातील काही भागांमध्ये झालेल्या ढगफुटीच्या (Cloudburst)घटनांमागे परदेशी हात असल्याची माहिती माझ्याकडे आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेत. राज्यातील गोदावर नदीच्या पर्जन्यकक्षेत झालेल्या ढगफुटीही याच कटाचा भाग असल्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलीय.

ढगफुटी हा नवीन प्रकार समोर येऊ लागलाय. हे किती खरं आहे मला ठाऊक नाही. आपल्या देशाशी शत्रुत्व असणारे काहीजण देशात वेगवगेळ्या ठिकाणी ढगफुटी घडवून आणत आहेत,” असं चंद्रशेखर राव म्हणालेत.  यापूर्वी त्यांनी काश्मीर, लेह-लडाख, त्यानंतर उत्तरखंडमध्ये हे घडवून आणलं आणि आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ते गोदावरीच्या परिसरामध्ये हे घडवून आणत आहेत,असं मुख्यमंत्री बैठकीमध्ये म्हणाले.