प्रथम श्रेणीत २१ हजार धावा आणि एक हजार विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Mike Proctor: दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक माइक प्रॉक्टर (Mike Proctor)  यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. प्रॉक्टर यांच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. माईक प्रॉक्टर हे दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते. प्रॉक्टर हे वर्णभेदानंतरच्या काळात दक्षिण आफ्रिकेचे पहिले प्रशिक्षक होते.

माइक प्रॉक्टरने (Mike Proctor)  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी 401 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 21,936 धावा केल्या आणि एकूण 1,417 बळी घेतले. 77 वर्षीय प्रॉक्टर यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान काही समस्या निर्माण झाल्या, त्यानंतर प्रॉक्टरला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.

बायकोने खरं सांगितलं
माईक प्रॉक्टरची पत्नी मरैनाने दक्षिण आफ्रिकेच्या न्यूज 24 वेबसाइटला सांगितले की, “माईक प्रॉक्टर यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेदरम्यान प्रॉक्टरला काही समस्या आल्या, त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. ते बेशुद्ध झाले आणि दुर्दैवाने त्यांचे डोळे पुन्हा उघडले नाहीत.

प्रॉक्टरने सात कसोटी खेळल्या
माईक प्रॉक्टरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तीन वर्षे चालली (1967-1970). या काळात त्यांनी सात कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी सहा जिंकले. आपल्या गोलंदाजीच्या शैलीसाठी क्रिकेट जगतात लोकप्रिय असलेल्या प्रॉक्टरने 15.02 च्या सरासरीने 41 बळी घेत चाहत्यांना प्रभावित केले.

तथापि, प्रॉक्टरची चमकदार आंतरराष्ट्रीय कारकीर्द 1970 मध्ये थांबली जेव्हा दक्षिण आफ्रिकेवर वर्णद्वेषी सरकारने बंदी घातली. या काळात दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही क्रिकेट उपक्रमात सहभागी होता आले नाही. प्रॉक्टरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द भलेही सर्वोत्तम नसेल, परंतु त्यांचे प्रथम श्रेणीतील आकडे उत्कृष्ट आहेत.

16 वर्षांची प्रथम श्रेणी कारकीर्द
माइक प्रॉक्टर 16 वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. यामध्ये 14 हंगाम इंग्लिश काऊंटीचे होते. त्यांनी पाच वर्षे ग्लुसेस्टरशायर संघाचे नेतृत्वही केले. प्रॉक्टरने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 48 शतके आणि 109 अर्धशतके झळकावली. माईक प्रॉक्टर हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात देशांतर्गत हंगामात 500 धावा करणारा आणि 50 बळी घेणारा एकमेव खेळाडू आहे.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया