आपला कुठलाही देव बॅचलर नाही, महापुरुषही बॅचलर नाही; चंद्रकांतदादांचे वक्तव्य

पुणे – आपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर (Bachelor) नसल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसा निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

TV9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याच रक्त हिरवं किंवा निळं नाही. परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही. सगळ्यांना कॉमन करुन त्याने पाठवलं. सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

माणसाचा जन्म स्पर्मपासून होतो. स्पर्म दिसत देखील नाही. पण स्पर्म 100 किलोचा माणूस तयार करतो. त्यात माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कोणी तरी आहे ना? सगळी माणसे त्याने वेगळी बनवली आहेत. त्याच्या स्पर्ममध्ये त्याने काय व्हायचंय हे ठरवलेलं असते, असं त्यांनी सांगितलं.