Pune : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवावरील वक्तव्याचे पुण्यातही पडसाद

पुणे – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) भाषणात मुलाचा उल्लेख केल्याने ते टीकेचे धनी बनले आहेत. अनेकांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे दुखावले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपला संताप आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

“ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही?,” अशी विचारणा श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. फेसबुकला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे.

दुसऱ्या बाजूला ठाकरेंची टीका शिंदे गटाला चांगलीच झोंबली असून पुण्यात याचे पडसाद पाहायला मिळाले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंना लिहिलेल्या पत्राचे पुण्यातही होर्डिंग्ज लावण्यात आले. पुण्यात युवा सेनेकडून बालगंधर्व चौकात हे होर्डिंग्ज लावण्यात आले. पुण्यात युवा सेनेकडून बालगंधर्व चौकात हे होर्डिंग्ज लावण्यात आले. पत्राच्या मजकूराचा होर्डिंग्जमध्ये उल्लेख आहे.