सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला? भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाला…

नवी दिल्ली- भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुली याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. (Sourav Ganguly has resigned as the chairman of the Board of Control for Cricket in India ?.)  यावेळी त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल चाहते आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानले आहेत. यासोबतच गांगुलीने पुढील वाटचालीसाठी लोकांची साथ मागितली.

२०२२ हे माझे क्रिकेटमधील ३० वे वर्ष आहे. मी 1992 मध्ये खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून आजपर्यंत क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. माझ्या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मला आभार मानायचे आहेत. मला पाठिंबा दिला आणि आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यास मदत केली. आज मी काहीतरी सुरू करण्‍याची योजना करत आहे जे मला वाटते की कदाचित अनेकांना मदत होईल. मला आशा आहे की जीवनाच्या या नवीन अध्यायात तुम्ही माझ्यासोबत राहाल.