Market Cap of Companies : टॉप-7 कंपन्यांचे मार्केट कॅप 3.04 लाख कोटी रुपयांनी वाढले , सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स  

Market Cap of Companies: गेल्या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली. 5 डिसेंबर 2023 रोजी सेन्सेक्सने प्रथमच 69,000 चा टप्पा ओलांडला. यामुळे देशातील 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मार्केट कॅप 3.04 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. एचडीएफसी बँक आणि एलआयसीच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 3,04,477.25 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, BSE चे मार्केट कॅप 2023 मध्ये 3.2 लाख कोटी रुपयांवरून 343.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

BSE ने 69000 चा आकडा पार केला

गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 2,344.41 अंकांनी किंवा 3.47 टक्क्यांनी वाढला. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, सेन्सेक्स 303.91 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी वाढून 69,825.60 अंकांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 74,076.15 कोटी रुपयांनी वाढून 12,54,664.74 कोटी रुपये झाले आहे. याशिवाय देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चे मार्केट कॅप देखील 65,558.6 कोटी रुपयांनी वाढून 4,89,428.32 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गुरुवारी एलआयसीच्या समभागांनी 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली होती. यासह विमा कंपनीने 5 लाख कोटी रुपयांचा आकडा गाठला होता. खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेचे मार्केट कॅप देखील 45,466.21 कोटी रुपयांनी वाढून 7,08,836.92 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

टीसीएस, रिलायन्स, एसबीआयही नफ्यात देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS चे मार्केट कॅप 42,732.72 कोटी रुपयांनी वाढून 13,26,918.39 कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार भांडवल 42,454.66 कोटी रुपयांनी वाढून 16,61,787.10 कोटी रुपये झाले. गेल्या आठवड्यात एसबीआयचे बाजार भांडवल 37,617.24 कोटी रुपयांनी वाढून 5,47,971.17 कोटी रुपये झाले. तसेच, देशातील आयटी कंपनी इन्फोसिसचे मार्केट कॅप 15,916.92 कोटी रुपयांनी वाढून 6,18,663.93 कोटी रुपये झाले आहे. तथापि, हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 9,844.79 कोटी रुपयांनी घसरून 5,92,414.19 कोटी रुपयांवर आले. या कालावधीत, भारती एअरटेलचे मार्केट कॅप देखील 8,569.98 कोटी रुपयांनी घसरून 5,61,896.90 कोटी रुपयांवर आले आहे. ITC चे भांडवल देखील 935.48 कोटी रुपयांनी घसरून 5,60,223.61 कोटी रुपये झाले.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी  रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. यानंतर TCS, HDFC बँक, ICICI बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, भारती एअरटेल, ITC, SBI आणि LIC आहेत.