MS Dhoni | धोनी टी20 वर्ल्ड कप खेळणार? माहीला वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळणार? काय म्हणाले सेहवाग आणि इरफान

Virender Sehwag & Irfan Pathan On MS Dhoni | महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2024 मध्ये सातत्याने उत्कृष्ट फलंदाजी सादर करत आहे. विशेषत: शेवटच्या षटकांमध्ये माहीला रोखणे विरोधी गोलंदाजांना अशक्यप्राय ठरत आहे. या मोसमात आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी 8 सामन्यांत 6 वेळा फलंदाजीसाठी उतरला आहे, परंतु एकही गोलंदाज त्याला बाद करू शकला नाही. तर कॅप्टन कूलने 35 चेंडूत 91 धावा केल्या आहेत. मात्र, त्यानंतर माहीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. तसेच, अनेक माजी क्रिकेटपटूंना महेंद्रसिंग धोनीने टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसावे अशी इच्छा आहे.

टी20 विश्वचषकात माहीची वाइल्ड कार्ड एंट्री!
वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण आणि वरुण आरोन यांसारख्या माजी क्रिकेटपटूंचे मत आहे की टी-20 विश्वचषकात माहीला वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली पाहिजे. इरफान पठाण म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) टी-20 विश्वचषकात खेळायचे असेल तर कदाचित कोणीही नाकारणार नाही. असे होत नसले तरी तसे झाले तर कोणाचाही आक्षेप असणार नाही. त्याचवेळी वीरेंद्र सेहवागने सांगितले की, या हंगामात माही 250 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करत आहे. तसेच, तो अद्याप बाहेर पडलेला नाही. तसेच, वीरेंद्र सेहवाग म्हणतो की टी-20 वर्ल्ड कपमध्ये माहीपेक्षा चांगला यष्टिरक्षक कोण असू शकतो?

माहीसाठी रोहित शर्मा काय म्हणाला?
नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीवर वक्तव्य केले होते. वास्तविक, जेव्हा रोहित शर्माला विचारण्यात आले की कोणत्या यष्टीरक्षकाला टी-20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळेल? या प्रश्नाच्या उत्तरात रोहित शर्मा म्हणाला की, महेंद्रसिंग धोनी अमेरिकेत येत असला तरी क्रिकेट खेळण्यासाठी नाही तर गोल्फ खेळायला येत आहे, त्याला पटवणे कठीण जाईल. यानंतर रोहित शर्माचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा