मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा; संघर्षकाळात अजितदादांची ताकत वाढली

Mumbai – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील बदलत्या नव्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं 40 आमदारांच्या पाठींब्याचं पत्र सादर करत पक्षाचं चिन्ह आणि नावावर दावा करणारी याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करत नऊ आमदारांवर – निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, एकाबाजूला हा संघर्ष सुरु असताना आता अजित पवारांची ताकत वाढणार आहे. कारण या कठीण काळात त्यांना आरपीआयच्या खरात गटाने पाठींबा दिला आहे. सोबतच अजितदादा हे मुख्यमंत्री व्हावेत अशी आशा देखील अध्यक्ष सचिन खरात यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाची आघाडी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचा पक्ष आहे. आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली आहे आणि आदरणीय अजितदादा रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे आहेत.

आदरणीय अजितदादा पवार यांनी सत्तेच्या माध्यमातून बहुजन, दलित,शेतकरी, कामगार, मजूर, शोषित वर्गाला न्याय दिला आताही या वर्गाला नक्कीच सत्तेच्या माध्यमातून न्याय देणार हे आम्हाला खात्री आहे आमचा पक्ष कालही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होता आजही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे यामुळेच आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाची इच्छा आहे की आदरणीय अजितदादा लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे.अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.