विधानसेभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा पक्षाचा प्रयत्न आहे – पाटील 

Pune  : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली असून या दोन्ही जागांवर कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल. याची उत्सुकता सगळ्यांना आता लागूून राहिली असताना आता चिंचवडच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण चिंचवडची जी (Chinchwad By-Election) जागा आहे,त्यावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने दावा केला आहे. चिंचवडची जागा शिवसेनेनं (Shiv Sena) लढावी, असं आमचं मत आहे. तर, पुण्यातील कसबा पेठेच्या जागेबाबत (Kasba Peth By-Election) राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसमध्ये (Congress) निर्णय होईल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला हे सुरु असताना दुसऱ्या बाजूला चिंचवड विधानसेभेची पोटनिवडणूक (chinchwad Bypoll Election 2023) बिनविरोध व्हावी, असा पक्षाचा प्रयत्न आहे, असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. चिंचवड  (Chinchwad)  विधानसेभेच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज चिंचवडमध्ये भाजपने बैठक बोलवली होती. त्यावेळी  (kasba peth),  त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचा भाजपचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता होती. मात्र त्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही भेटणार असल्याचे म्हंटले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक कशी बिनविरोध होईल यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.