Narayan Rane | नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे शिंदे गट नाराज; महायुतीत धुसफूस सुरूच

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाने त्यांची बारावी यादी जाहीर करत नारायण राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. मतदारसंघातून शिवसेनेचे नेते किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. विशेषत: शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्यासाठी जोर लावला होता. पण, आता नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने उदय सामंत यांचा नाईलाज झाला आहे.

दरम्यान, रत्नागिरी सिंधुदूर्गमध्ये नारायण राणेंना उमेदवारी दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक अद्यापही नाराज आहेत.. शिवसैनिकांच्या विरोधामुळं कुडाळमधील समन्वय बैठक मंत्री रविंद्र चव्हाण यांना अर्ध्यावर सोडावी लागल्याची माहिती मिळतेय विशेष म्हणजे या बैठकीला किरण सामंतही उपस्थित होते.

बैठकीत नितेश राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी प्रचंड राग व्यक्त केला. नारायण राणे (Narayan Rane) यांचे काम करणार नसल्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.आता याप्रकरणी पुन्हा दोन दिवसांनी समन्वय बैठक घेण्यात येणार असून त्यावेळी शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा असेल..

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन