माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही ‘आप’ला मतं दिली – शरद पवार

मुंबई : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे.

उत्तरप्रदेशसह सर्व देशाचे लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे पंजाबची. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे बोलले जात असताना आजच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी फेरबदल करत चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं होतं. काँग्रेसमधील अंतर्गत कलह त्यातही कॅप्टन अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू हा वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हा उपाय केला होता. पण त्यानंतरही कलह काही थांबला नाही. नंतर सिद्धू आणि चन्नी असा वाद सुरू झाला. त्यातच अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली. आम आमदनी पक्षाने निवडणुकी तब्बल ९२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस फक्त १८ जागांवर आघाडी घेतली आहे. यामध्ये काँग्रेसचे १७ पैकी १४ मंत्री पिछाडीवर असून त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.

या निकालावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबमध्ये आपला स्वीकारलं. पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला आहे. दरम्यान दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचा-यांनीही ‘आप’ला मतं दिली होती. पंजाबच्या शेतक-यांत केंद्र सरकारविषयी राग होता. 5 पैकी 4 राज्यात भाजपचं राज्य होतं. पंजाबमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. तिथला बदल भाजपला अनुकूल नाही. हा बदल काँग्रेसला झटका देणारा आहे. काँग्रेसची स्थिती पंजबामध्ये चांगली होती. मात्र जे बदल झालं ते जनतेनं नाकारलेत. अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणं काँग्रेसची चूक झाली. दिल्लीत जे आंदोलन झालं त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभागी झाला होता. किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय. म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत ‘आप’ला सत्ता दिली. पंजाबच्या शेतकऱ्यांत केंद्र सरकारविषयी राग होता. असं पवार म्हणाले.