पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतिन यांच्यात फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य क्षेत्राशी संबंधित विविध घटकांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि जोहान्सबर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेसह परस्पर स्वारस्याच्या इतर क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांबाबत विचारांची देवाणघेवाण केली.

येत्या 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्याबाबत असमर्थता व्यक्त करत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सांगितले की या बैठकीमध्ये रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह रशियाचे प्रतिनिधित्व करतील.

यासंदर्भात रशियाच्या निर्णयाला मान देत, पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षतेला सातत्याने पाठींबा दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी यापुढील काळात एकमेकांच्या संपर्कात राहण्यावर सहमती दर्शवली.