वाचाळपणा भोवला; सुषमा अंधारे यांच्यावर आली माफी मागण्याची वेळ 

पुणे-  ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे त्यांच्या वाचाळपणासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी अनेक हिंदू देवीदेवतांची यथेच्छ बदनामी केली आहे. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आता त्यांनी मोर्चा अखिल विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाकडे वळवला आहे.

वारकरी संप्रदायातील महान संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर तसेच महाबली हनुमान यांच्याबाबत अक्षरशः गरळ ओकली आहे. त्यांच्या भाषणामधील काही वक्तव्यामुळे वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.दरम्यान, आता चौफेर टीका होऊ लागल्याने सुषमा अंधारे यांना माफी मागावी लागली आहे.

मी कुणाच्याही श्रद्धे आड आले नाही. पण तरीही राजकीय सूडबुद्धीतूनच मला विरोध केला जात आहे. मला विरोध करण्यामागे भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहेत, असं सांगतानाच तरीही जर माझ्यामुळे संतांच्या, वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते, असं म्हणत अंधारे यांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे.

मी कबीर पंथी आहे. मी कर्मकांड मानत नाही. मी फक्त चैतन्य मानते. तहीरी मला विरोध होतोय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला सुडबुद्धीने विरोध होतोय. विरोध करणाऱ्यांमागे भाजपचा हात आहे. विरोध करणारा वारकऱ्यांचा गट भाजपचा आहे, असं त्या म्हणाल्या.वारकऱ्यांनी काल माझी प्रेत यात्रा काढली. या देशात अनेक सुधारकांच्या प्रेत यात्रा काढल्या गेल्यात, त्याला इतिहास साक्ष आहे. मला आनंद आहे माझी एवढी दखल घेतली जात आहे. पण दखल घेताना राजकीय सूडबुद्धीने घेतली जात आहे, असलं सांगतानाच वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.