आघाडीतीलच ‘या’ मंत्र्यांनी केला ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख

इंदापूर : सध्या महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका अजूनही वाढत चालली आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे हे सध्या एका वेगळ्याच विषयांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका भर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी ही चुक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दत्तात्रेय भरणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

तेव्हा दत्तात्रय भरणे हे भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांच्या भाषणांची सुरुवात ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने झाली. त्यावेळी व्यासपीठावरील सर्व लोक दत्तात्रय भरणे यांच्या कडे पाहु लागले. त्यानंतर लगेचच व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ दत्तामामांना त्यांची चूक लक्षात आणून दिली.

दत्तात्रय भरणे यांनी झालेली चुक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत भाषण सुरू ठेवलं. तेव्हा उपस्थिती असलेल्या लोकांनामध्ये एकच खळबळ उडाली होती. तर थोडा वेळ बराच त्या कार्यक्रमात हशा पिकला. तेव्हा भरणे यांनी सतत डोक्यात खूप विचार सुरु असल्याने होतं असं कधीकधी, असं म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.