मी मुख्यमंत्री आहे, दहशतवादी नाही; हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने चन्नी आक्रमक

जालंधर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जालंधर याठिकाणी सभा असल्याकारणाने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या रँलीत सहभागी होता आलं नाही. त्यानंतर चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की , मी मुख्यमंत्री आहे, दहशतवादी नाही.

राहुल गांधींच्या होशियारपूर यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी चन्नी चंदीगडहून विमानाने जाणार होते पण अखेरीस त्यांना हेलिपॅडवरूनच परतावे लागले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा घेण्यास पंजाब मध्ये दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टरला परवानगी देण्यात आली नाही.

चरणजीत सिंग चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्यानंतर म्हणाले की, चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री आहेत, ते दहशतवादी नाहीत, तुम्ही त्यांना होशियारपूरला जाण्यापासून रोखत आहात. हा लोकशाहीचा योग्य मार्ग नाही. पंतप्रधानांच्या जालंधर दौऱ्यामुळे ‘नो फ्लाय झोन’ लागू केल्यामुळे चरणजीत सिंग चन्नी यांना राहुल गांधींच्या सभेला जातं आलं नाही.

दुसरीकडे, जालंधरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. २०१४ मधील एका घटनेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, युवराज अमृतसरला जात असल्यामुळे पंजाबमध्ये त्यांचे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर प्रचारासाठी पंजाबमध्ये गेले असताना ही घटना घडल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.