संजय राऊत आज धमाका करणार ! भाजपचे ‘ते’ नेते संजय राऊत यांच्या रडारवर

मुंबई : आज सायंकाळी ४ वाजता शिवसेनेची बहुचर्चित पत्रकार परिषदेत पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि हजारो लोक सहभागी होणार आहेत. काल खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे होणाऱ्या पत्रकार परिषदच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यामुळे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

शिवसेनेची पत्रकार परिषद झाल्यानंतर महाविकास आघाडीची देखील पत्रकार परिषद होणार आहे. संजय राऊत हे भाजपच्या साडेतीन नेत्यांमध्ये गौप्यस्फोट करणार आहेत. ते म्हणाले की, आजची पत्रकार परिषद विरोधक आणि तपास यंत्रणांनी बघायला हवी, असा इशारा ही संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे. आज समजले की महाराष्ट्र काय आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना जी मर्दानगी शिकवली ती मर्दानगी दिसेल. कुणीही उठावं आणि महाराष्ट्राची बदनामी करावं. हे चालणार नाही असं संजय राऊत म्हणाले. आम्ही खुप बदार्श्त केलं आहे, आता बरबादही करू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्यांना आव्हान देताना म्हणाले की भाजपच्या धमक्यांना मी घाबरत नाही. जे उखाडायचं ते उखाडा. केंद्र तपास यंत्रणांच्या दादागिरीला आजच्या पत्रकार परिषदेत उत्तर देणार आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत हे भाजपच्या कोणत्या नेत्यांची नावं उघड करणार आहेत. त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.