भाजपात एकही ‘माय का लाल’ नाही जो काश्मीरी पंडितांच्या बोलेल – ठाकरे 

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली. हिंदुत्व (Hindutva), काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit),बाबरी (Babri), महागाई (Inflation), पाणीप्रश्न (Water Question)आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला.

अच्छे दिन आले का? कधी येणार? काहीच नाही, ते झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्तेवर यायचं, मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आली की पुन्हा कोणती तरी मशीद पाडू (Let’s demolish the mosque) म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, अशी भाजपाची थेरं आहेत असं ते म्हणाले.

ईडी (ED), सीबीआय (CBI) लावा, पण काश्मीरमध्येही धाडी टाका. काश्मीरमध्ये पंडित भयभीत होऊन घरं सोडत आहेत, पण भाजपात एकही ‘माय का लाल’ नाही जो यावर बोलेल. इथं येऊन बांग्लादेशी येऊन राहत असतील, तर माझ्याच देशातील काश्मिरी पंडीतांना का राहता येत नाही.