करगळती रोखण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता; जीएसटी दरवाढीबाबत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Finance Minister

नवी दिल्ली– काही वस्तूंवरील जीएसटी (GST) दर वाढवण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामागे करगळती रोखणं हा उद्देश असल्याचं अर्थमंत्री (Finance Minister)निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी काल स्पष्ट केलं. यासंदर्भात त्यांनी केलेल्या अनेक ट्विटमध्ये, करगळती रोखण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता असं म्हटलं आहे.

अधिकारी, मंत्री गटासह विविध स्तरांवर या निर्णयावर विचार करण्यात आल्यानंतर; सर्व सदस्यांच्या पूर्ण सहमतीनेच जीएसटी परिषदेनं जीएसटी वाढीची शिफारस केली, असंही सीतारामन यांनी नमूद केलं आहे. जीएसटी प्रणाली अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा पॅकबंद ब्रँडेड धान्य, डाळी आणि पिठं यावर पाच टक्के दर लागू करण्यात आला होता. त्यानंतर तो फक्त नोंदणीकृत ब्रँड्स किंवा ब्रँड अंतर्गत विकल्या जाणार्‍या पुरवठादाराने अंमलबजावणी करण्यायोग्य अधिकार रद्द केलेला नाही अशा वस्तूंवरच तो लागू होता.

तथापि, लवकरच प्रतिष्ठित उत्पादक आणि कंपन्यांकडून या तरतुदीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचं दिसून आलं. आणि हळूहळू या वस्तूंवरील GST महसूल लक्षणीयरीत्या कमी झाला. असंही सीतारमण यांनी म्हटलं आहे.