भाजपा – शिवसेना युती सरकारच्या पायगुणाने ओबीसी आरक्षण आले… निवडणुकीचा मार्गही खुला झाला – वाघ 

Mumbai –   राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानं आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. याशिवाय राज्यात रखडलेल्या निवडणुका तातडीनं घेण्यासंदर्भात पावलं उचलण्यासही कोर्टानं सांगितलं आहे. येत्या दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, असे आदेश दिले आहेत.

जयंतकुमार बाठिंया आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये ओबीसांनी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये २७ टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली होती. कोर्टानं हा अहवाल मान्य केल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळणार आहे. दरम्यान, या मोठ्या निकालानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

याबाबत बोलताना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, भाजपाच्या ओबीसी धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब…राज्यात सत्तापालट झाला आणि भाजपा – शिवसेना युती सरकारच्या पायगुणाने ओबीसी आरक्षण आले…निवडणुकीचा मार्गही खुला झाला…जय हो….विजय हो …अभिनंदन असं वाघ यांनी म्हटले आहे.