Rahul Gandhi | राहुल गांधीं यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत करण्यात आली वाढ

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधींप्रमाणेच बॉम्बस्फोटात उडवले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्रातील नाशिक पोलिसांना मिळाली आहे. न्याय जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षांवर बॉम्ब हल्ला करण्यात येणार आहे. हे इनपुट मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली आहे. तसेच दिल्ली पोलीस, यूपी आणि मध्य प्रदेश पोलिसांना राहुल गांधींची सुरक्षा अधिक कडक करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. त्यांची न्याय जोडो यात्रा २ मार्चला मध्य प्रदेशात दाखल होत आहे.

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर २४ अकबर रोड येथील त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानाजवळ गस्त वाढवण्यात आली आहे. साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

गृहमंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले
विशेष सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गृह मंत्रालयाने महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांना इनपुट तपासण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याबाबत मिळालेले इनपुट किती गंभीर आहेत हे दोन्ही राज्यांचे पोलीस शोधत आहेत. तपासासाठी विशेष कक्ष तैनात करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे
राहुल गांधींना (Rahul Gandhi) सध्या झेड प्लस सुरक्षा आहे. यामध्ये १० हून अधिक एनएसजी कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह ५५ प्रशिक्षित कर्मचारी संबंधित व्यक्तीजवळ तैनात आहेत. हे सर्व कमांडो २४ तास त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवतात. प्रत्येक कमांडो मार्शल आर्टमध्ये तज्ञ असतो.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’